रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याची ग्रामस्थांची चेतावणी
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/12/09224806/road.jpg)
दोडामार्ग – तालुक्यातील शिरवल, केर ते भेकुर्ली हा रस्ता करून बरीच वर्षे झाली; पण काही ठिकाणी संबंधित अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने काम अपूर्ण ठेवले आहे. या रस्त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करून, तसेच संपर्क साधूनही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता नेहमीच वाहतुकीस निरूपयोगी ठरत आहे. आता रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे वाहन चालवणेही अवघड झाले आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्यांनी तातडीने झाडी तोडून रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन करू, अशी चेतावणी केर आणि भेकुर्ली येथील ग्रामस्थांनी दिली आहे. (जनतेच्या करातूनच विकासकामांसाठी पैसा खर्च केला जातो. असे असतांना अधिकारी आणि ठेकेदार यांनी त्याची जाणीव न ठेवणे अन् कामे निकृष्ट करणे याला कृतघ्नपणा म्हटल्यास चुकीचे ठरेल का ? ग्रामस्थांच्या आरोपानुसार या कामाची चौकशी झाली पाहिजे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाही दुरवस्था होण्याला उत्तरदायी असणार्यांवर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे ! |