धनबाद (झारखंड) येथे ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे धरणे आंदोलन
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/12/09231505/Dhanbad_Andolan_700.jpg)
धनबाद (झारखंड) – बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी आंदोलन करणार्या ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची सुटका आणि तेथील हिंदूंची सुरक्षा यांसाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी आवाहन धनबादमधील भाजप आमदार राज सिन्हा यांनी केले. येथील रणधीर वर्मा चौकामध्ये ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने एक दिवसाचे ‘धरणे आंदोलन’ करण्यात आले. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) त्या वेळी आमदार सिन्हा बोलत होते. या आंदोलनात ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील माधव दास, ‘इस्कॉन, धनबाद’चे श्री. दामोदर प्रभु, ‘विश्व हिंदु परिषदे’चे श्री. सुनील कुमार, ‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. शंभू गवारे, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे निमंत्रक डॉ. निशान दास यांच्यासह १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी सहभाग घेतला.
याच विषयाच्यासंदर्भात झारखंडमधील हजारीबाग आणि पूर्व सिंगभूम जिल्ह्यांतील जिल्हा उपायुक्त कार्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री अजित यादव, पिंकू भुईया, हजारीबाग येथील शंकर कुमार, पूर्व सिंगभूम येथील अधिवक्ता प्रणिता श्रीवास्तव, श्रीमती रंजना वर्मा, चित्रांश श्रीवास्तव आदी धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
वैशिष्ट्यपूर्ण
धनबाद येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी बंगालमधील पुरुलिया येथून २ धर्मप्रेमी ७० किलोमीटर अंतरावरून आले होते.