सातारा पोलिसांना १७ नवीन वाहने !

सातारा, ९ डिसेंबर (वार्ता.) – सातारा जिल्‍ह्यात घडत असलेल्‍या गुन्‍ह्यांना प्रतिबंध घालण्‍यासाठी पोलिसांची गस्‍त महत्त्वाची असते. ही निकड लक्षात घेऊन सातारा जिल्‍हा पोलीस दलाच्‍या ताब्‍यात ४ पी.सी.आर्. आणि १३ दुचाकी अशी १७ नवीन वाहने उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहेत. यामुळे जिल्‍ह्यातील वाढत्‍या चोरांना आळा बसण्‍यासाठी साहाय्‍य होईल.