ठाणे – हिंदु समाजाचा मूक मोर्चा म्हणजे जागृती आणि चेतावणी आहे, असे विधान भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केले, तर भाजपचे आमदार अधिवक्ता निरंजन डावखरे यांनी ‘देश सुरक्षित ठेवायचा असेल, तर अशाच प्रकारे आपण एकत्र रहायला हवे’, असे आवाहन केले. सकल हिंदु समाज आणि तमाम हिंदु संघटनांच्या वतीने येथे बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अन्यायाच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. त्यात ते बोलत होते. या वेळी सहस्रो हिंदूंनी हाती भगवे ध्वज घेतले, तसेच बांगलादेशाच्या विरोधात फलक घेऊन हिंदू सहभागी झाले होते. या वेळी नागरिकांनी भारतमातेचा जयजयकार केला, तसेच ‘एक हैं तो सेफ हैं (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू’, तसेच ‘बटेंगे तो कटेंगे (विभाजित झालो, तर कापले जाऊ) अशा घोषणा देत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
या मोर्चात ‘इस्कॉन’चे ऊरूक्रमा गौरंगा दास, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नारायण पवार, संदीप लेले, सुनेश जोशी यांसह हिंदु संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.