चांदीच्या मखराची तोडफोड, दानपेटी चोरली
उरुळी कांचन (पुणे) – प्रतिपंढरपूर नावाने प्रसिद्ध असलेल्या डाळिंब बन (ता. दौंड) येथील श्री विठ्ठल मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. ७ डिसेंबरच्या मध्यरात्री २ वाजता घटना घडल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यातून समजून येते. या प्रकरणी डाळिंब बनचे सरपंच बजरंग म्हस्के यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
श्री विठ्ठल मंदिर रात्री नियमितपणे बंद करण्यात आले. ८ डिसेंबर या दिवशी पुजारी सकाळी ६ वाजता मंदिरामध्ये आल्यानंतर कुलूप तुटून पडल्याचे दिसले. श्री विठ्ठल मूर्तीच्या पाठीमागील चांदीच्या मखराची तोडफोड करून, दानपेटी चोरून नेल्याचे लक्षात आले. ही दानपेटी २०० कि.मी. अंतरावर फेकून देण्यात आल्याचे दिसले.
सरपंच म्हस्के म्हणाले, ‘‘मंदिरामध्ये झालेल्या चोरीमुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पोलिसांनी चोरीचे लवकरात लवकर अन्वेषण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.’’
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरांमध्ये चोर्या आणि तोडफोड होणे, हे पोलिसांची अकार्यक्षमता दर्शवते ! पोलीस कधी सुधारणा करणार ? |