मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) – विधान परिषदेचे सभागृहनेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या वतीने सभागृहाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात असल्याची घोषणा सभागृहात केली. ९ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेचे विशेष अधिवेशन उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. राज्यातील महनीय व्यक्ती आणि विधीमंडळाचे सदस्य यांच्याविषयी शोकप्रस्ताव या वेळी नीलम गोर्हे यांनी मांडला.