पोर्शेकार अपघात प्रकरणी आधुनिक वैद्यांविरोधात खटला चालवण्यास राज्यशासनाची संमती !

कल्याणीनगर येथील पोर्शेकार अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलासह त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने पालटल्याच्या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या न्याय वैद्यक विभागाने फौजदारी खटला चालवण्यास राज्यशासनाने संमती दिली आहे.

चंदन चोरट्यांवर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांवर गुन्हा नोंद करणार ! – पुणे पोलीस

विधी महाविद्यालयाच्या रस्त्यावर गस्त घालणार्‍या पोलिसांवर चंदन चोरांनी आक्रमण केले. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये घायाळ झालेल्या चोरट्यांवर वैद्यकीय उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यावर गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली आहे.