विजयपुरा (कर्नाटक) : शेतकर्‍यांच्या भूमींनंतर आता हिंदु मठांच्या भूमीही ‘वक्फ’ मालमत्ता !

विजयपुरा (कर्नाटक) – जिल्ह्यातील सिंदगी शहरात विरक्त मठाची संपत्ती आता वक्फ संपत्ती बनली आहे. ‘सर्वे क्रमांक १०२०’मधील मालमत्तेला ‘वक्फ बोर्डा’ने कब्रस्तान म्हणून नोंदवले आहे. सिद्धलिंग स्वामीजी या मठाचे पीठाधिपती असतांना पहाणी कॉलम क्रमांक ११ रिकामे होते. वर्ष २०१८-१९ मध्ये रिकाम्या असलेल्या या क्षेत्राला ‘वक्फ बोर्ड’ म्हणून समाविष्ट केले गेले.

१३ व्या शतकात स्थापन झालेला मठ कब्रस्तान कसे बनले ? वक्फ बोर्डात १.२८ एकर मालमत्तेचा समावेश केल्याने मठाच्या भक्तांनी तीव्र विरोध करत संताप व्यक्त केला आहे. सिंदगी तालुक्यातील अनेक हिंदु मठांच्या मालमत्तेचा वक्फ बोर्डात समावेश झाला असावा, अशी शंका भक्तांनी व्यक्त केली आहे. वक्फ बोर्डात समावेश झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भक्त आता संघटित होऊन विरोध करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • देशातील हिंदू जागृत झाला नाही, तर आज हिंदु मठ वक्फची मालमत्ता असल्याचा दावा करणारे उद्या भारताचा मोठा भूभाग स्वत:च्या नियंत्रणात घेऊन भारताच्या अनेक फाळण्या करतील.
  • यातून हेच स्पष्ट होते की, वक्फ कायद्यात पालट करणे आवश्यक नसून तो रहित करणेच आवश्यक आहे ! यामुळेच हिंदूंनी संघटितपणे वक्फ कायदा रहित करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे !