PM Modi : शहरी नक्षलवाद्यांना ओळखून त्यांना उघडे पाडले पाहिजे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कर्णावती (गुजरात) – देशाच्या बाहेर आणि आत काही शक्ती देश अस्थिर करण्यासाठी काम करत आहेत. जंगलात नक्षलवाद संपत आहे, परंतु शहरी नक्षलवादी आता डोके वर काढत आहेत. शहरी नक्षलवाद्यांना ओळखून त्यांना उघडे पाडले पाहिजे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) येथे बोलतांना सांगितले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘राष्ट्रीय एकता दिवस’ परेडमध्येही सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात शेजारी देश पाकिस्तानचे नाव न घेता आतंकवाद्यांच्या ‘मालकांना’ चेतावणी दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले,

१. आज आपल्यासमोर एक भारत आहे, ज्याच्याकडे दृष्टी, दिशा आणि दृढ निश्‍चय आहे, जो सशक्त अन् सर्वसमावेशक आहे. तसेच संवेदनशील आणि सतर्क आहे. जो नम्र आहे आणि विकासाच्या मार्गावरही आहे.

२. ‘ईशान्य भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला; पण आम्ही संवाद, विश्‍वास आणि विकास यांच्या माध्यमांतून वेगळेपणाच्या भावनेची आग विझवली.

३. गेल्या १० वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे आज भारतात नक्षलवादही शेवटचा श्‍वास मोजत आहे.