छत्रपती शिवरायांना अपेक्षित रयतेचे राज्य साकार करणारा अर्थसंकल्प ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

राज्यातील जनता विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेच्या हितार्थ निर्णय घेत असलेल्या या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा मला विश्वास आहे.

अग्रवाल पिता-पुत्राला जामीन दिल्यास ते देशाबाहेर पळून जाऊ शकतात ! – पुणे पोलिसांचा दावा

गुन्ह्यामध्ये विशाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना जामीन मिळाल्यानंतर ते तक्रारदार आणि साक्षीदार यांच्यावर दबाव आणू शकतात. पुराव्यांमध्ये छेडछाड (पालट) करून परदेशी पळून जाऊ शकतात, असा दावा पुणे पोलीस आणि सरकारी अधिवक्ते यांनी केला.

अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आदेश दिला की, अवैध पब, तसेच अमली पदार्थ विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करावी.

हडपसर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधात महामार्गावर ‘रस्ता बंद’ आंदोलन !

हडपसर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी येथील नाशिक-पुणे महामार्गावर २८ जून या दिवशी शिवप्रेमी संघटनांनी एकत्रित येऊन ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.

इंद्रायणी नदीत सांडपाणी कुठून मिसळते, हे सांगूनही त्यावर उपाययोजना नाही ! – ह.भ.प. निरंजननाथ महाराज

वारकर्‍यांनी सांगूनही संवेदनशून्य प्रशासन यावर काहीच करत नाही, हे संतापजनक ! तथाकथित पुरोगामी आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत ? कि त्यांचे कारखानदारांशी लागेबांधे आहेत ?

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा पाचवा दिवस (२८ जून) : उद्बोधन सत्र – मंदिरांच्या रक्षणासाठी न्यायालयीन प्रयत्न

स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांसाठी मंदिरे शक्तीकेंद्र बनली होती. त्यामुळे इंग्रजांनी एक कायदा बनवून मंदिरांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अल्प करण्याचा प्रयत्न केला.

Temple Priest Beaten : बेंगळुरू (कर्नाटक) येथे मंदिराच्या पुजार्‍याला अनोळखी लोकांकडून मारहाण

बेंगळुरू येथील होसकोटे शहरातील कण्णुरू येथे अंजनेय स्वामी मंदिराचे पुजारी आनंद हे मंदिरात पूजा करून परत येत असतांना वाटेत अनोळखी समाजकंटकांनी त्यांना मारहाण केली आणि पळून गेले.

देहू (पुणे) येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान !

‘ग्यानबा तुकाराम’, ‘विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नामगजरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. या नामगजराने अवघा देऊळवाडा परिसर दुमदुमून गेला होता.

शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ यांची घोषणा !

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून या दिवशी वर्ष २०२४-२५ चा २० सहस्र ५१ कोटी रुपयांचा महसुली तूट असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला.

मंदिराचे सौंदर्यीकरण करायला ती पर्यटनस्थळे नव्हेत, तीर्थक्षेत्रे आहेत ! – अनिल कुमार धीर, संयोजक, ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’, ओडिशा

ओडिशामधील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी २२ प्राचीन मठ तोडण्यात आले. या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो, तर आम्हालाच १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.