मुंबई, २८ जून (वार्ता.) – महाराष्ट्र हा देशात नेहमी आर्थिक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत साहाय्याचा आधार देणार्या योजना प्रस्तावित केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्य आणि कल्याणकारी संकल्पना साकार करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २८ जून या दिवशी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना केले.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील जनता विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेच्या हितार्थ निर्णय घेत असलेल्या या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा मला विश्वास आहे.