देहूतील देऊळवाड्यातून २७ जूनला जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्थान सोहळ्यास उपस्थित रहाणार !

सातारा येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या समस्यांचे निराकरण !

महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचार यांच्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करायला हवी

महाराष्ट्रातील सागरी आणि जल मार्ग विकसित केले जाणार !

केंद्रशासनाच्या सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सागरी आणि जल मार्ग विकसित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या अंतर्गत अभ्यास करण्यासाठी शासनाने राज्य सागरी आणि जल मार्ग वाहतूक समितीची स्थापना केली आहे.

एन्.एम्.एम्.टी. सेवेविषयीच्या तक्रारीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क साधावा ! – एन्.एम्.एम्.टी. प्रशासन

प्रवाशांनी प्रवास करतांना उपक्रमाच्या बसगाड्या रस्त्यावर बंद पडल्या, काही नैसर्गिक आपत्ती ओढावली किंवा सेवाविषयक काही तक्रार असेल, तर तात्काळ उपक्रमाच्या १८००२२००४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर जगातील सर्वाधिक मोठा !

आतातरी मुंबई रेल्वे प्रशासन ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करील का ?

एफ्.सी. रोडवरील ‘एल् थ्री’ बारमधील मेजवानीसाठी पुण्यातूनच अमली पदार्थांचा पुरवठा झाल्याचे उघड !

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील लिक्विड लीजर लाउंज (एल् थ्री) बारमध्ये झालेल्या मेजवानीतील तरुणांना अमली पदार्थांचा पुरवठा पुण्यातूनच झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणातून ही गोष्ट समोर आली आहे.

नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेलपर्यंतच धावतील !

३० जून ते ३० जुलै या कालावधीत मध्य आणि कोकण रेल्वे मार्गे धावणारी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंतच धावेल अन् पनवेलहूनच सुटतील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

धर्मप्रसारासाठी अधिकाधिक संत निर्माण होणे आवश्यक ! – बाल सुब्रह्मण्यम्, संचालक, मंगलतीर्थ इस्टेट आणि ब्रुकफील्ड इस्टेट, चेन्नई, तमिळनाडू

वेद, पुराणे, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारत आदी धर्मग्रंथांमध्ये एकही शब्दाचा पालट न होता ते आपल्यापर्यंत पोचले आहेत. हे केवळ गुरु-शिष्य परंपरेमुळे झाले. त्यामुळे आपण गुरु-शिष्य परंपरेचा आदर केला पाहिजे. हे अनमोल ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे आपले दायित्व आहे

अहिल्यानगर येथील आयुक्तांवर ८ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई !

लाचखोरीत मोठे प्रशासकीय अधिकारी सहभागी असणे, हे भ्रष्टाचाराची समस्या गंभीर बनल्याचे लक्षण !

कायदे सिद्ध करण्यासाठी अनेक देशांनी मनुस्मृतीचा संदर्भ घेतला ! – भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, राष्ट्रीय प्रवचनकार आणि कीर्तनकार, मुंबई, महाराष्ट्र

धर्म समजण्यासाठी भगवंताने वेदांची निर्मिती केली. सोने जुने झाले; म्हणून त्याचे मूल्य न्यून होत नाही. वेदांमधील ज्ञान शाश्वत आहे. हे सांगणारा मनु हा पृथ्वीवरील पहिला व्यक्ती होता. मनु हा राजा होता. जेव्हा पाश्चात्यांना कपडे परिधान करण्याचेही ज्ञान नव्हते, तेव्हा मनु याने ‘मनुस्मृती’ लिहिली.