मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर जगातील सर्वाधिक मोठा !

  • मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे !

  • प्रतिदिन ७ प्रवासी जीव गमावतात !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर ३८.०८ टक्के इतका आहे. प्रतिदिन ७ प्रवासी स्वत:चा जीव गमावतात. हा जगातील सर्वाधिक मोठा मृत्यूदर असणे, हे लाजिरवाणे आहे, असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने ओढले आहेत. यावर दोन्ही रेल्वे प्रशासनाच्या महाव्यवस्थापकांना सविस्तर प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले असून सॉलिसिटर जनरल यांना पुढील सुनावणीत न्यायालयासमोर उपस्थित रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात पालघर येथील यतीन जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. त्यात म्हटले आहे की, मुंबईतील उपनगरीय रेल्वेमुळे होणारा मृत्यूदर हा ३८.०८ टक्के असून तो न्यूयॉर्कमध्ये ९.०८ टक्के, फ्रान्समध्ये १.४५ टक्के, तर लंडनमध्ये १.४३ टक्के इतका आहे.

संपादकीय भूमिका

आतातरी मुंबई रेल्वे प्रशासन ही स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करील का ?