सातारा येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या समस्यांचे निराकरण !

सातारा – महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचार यांच्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करायला हवी. तक्रारींची राज्य महिला आयोग सोडवणूक करून पीडितांचे जीवन सुखमय होण्यासाठी प्रयत्नरत राहील, असे आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली. सातारा येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी रूपाली चाकणकर बोलत होत्या. येथे सातारा जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नावर जनसुनावणी झाली. या वेळी २४९ हून अधिक महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न झाला.