एन्.एम्.एम्.टी. सेवेविषयीच्या तक्रारीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांकावर संपर्क साधावा ! – एन्.एम्.एम्.टी. प्रशासन

नवी मुंबई – संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा अन्य वेळीही एन्.एम्.एम्.टी.  सेवेविषयी प्रवाशांच्या काही तक्रारी असतील, तर त्यांनी १८००२२००४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एन्.एम्.एम्.टी. प्रशासनाने केले आहे. याविषयीचे सूचनापत्रक सर्व बसगाड्यांमध्ये लावण्यात आले आहे.

या सूचनापत्रकात म्हटले आहे की, संभाव्य अतीवृष्टी आणि संततधार पाऊस यांमुळे उद्भवणार्‍या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एन्.एम्.एम्.टी. प्रशासन सिद्ध आहे. प्रवाशांनी प्रवास करतांना उपक्रमाच्या बसगाड्या रस्त्यावर बंद पडल्या, काही नैसर्गिक आपत्ती ओढावली किंवा सेवाविषयक काही तक्रार असेल, तर तात्काळ उपक्रमाच्या १८००२२००४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित सेवा २४ घंटे निःशुल्क कार्यान्वित आहे, तसेच तुर्भे आगार संपर्क क्रमांक ८३५६८३३५६६, आसूडगाव आगार संपर्क क्रमांक ८३५६८३३३९० आणि घणसोली आगार संपर्क क्रमांक ८३५६८३३५४५ या क्रमांकांवर प्रवासी संपर्क साधू शकतात, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी केले आहे.