नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेलपर्यंतच धावतील !

३० जून ते ३० जुलै या कालावधीसाठी कोकण रेल्वे प्रशासनाची सूचना !

मुंबई – मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे पायाभूत कामासाठी १ ते ३० जुलैपर्यंत ‘ब्लॉक’ घेण्यात आला आहे. त्यामुळे ३० जून ते ३० जुलै या कालावधीत मध्य आणि कोकण रेल्वे मार्गे धावणारी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंतच धावेल अन् पनवेलहूनच सुटतील, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.