मुंबई, २७ जून (वार्ता.) – केंद्रशासनाच्या सागरमाला प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सागरी आणि जल मार्ग विकसित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या अंतर्गत अभ्यास करण्यासाठी शासनाने राज्य सागरी आणि जल मार्ग वाहतूक समितीची स्थापना केली आहे. जलमार्गाद्वारे राज्याच्या अंतर्गत वाहतूक विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूत्रांचा ही समिती अभ्यास करणार आहे. राज्यशासनाच्या परिवहन आणि बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ, गृह विभाग, मुंबई बंदर प्राधिकरण, मत्स्यव्यवसाय, मध्य रेल्वे विभाग या विभागांचे अधिकारी सदस्य म्हणून कार्यरत असणार आहेत.