|
अहिल्यानगर – येथील महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) मोठी कारवाई केली आहे. त्यांचे रहाते घर ‘सील’ केले आहे. लिपिक शेखर देशपांडे याच्याद्वारे त्यांनी लाचेची मागणी केली होती. (लाचखोरांवर कठोर कारवाई केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही. – संपादक) ‘एसीबी’ पथकाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तांसह लिपिक पसार झाले आहेत. या प्रकरणात एसीबीने डॉ. पंकज जावळे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. बांधकामाची अनुमती देण्यासाठी अहिल्यानगर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी ८ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एका ‘कन्स्ट्रक्शन फर्म’च्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. याच प्रकरणात १९ आणि २० जून या दिवशी ही लाच मागितली होती.
२७ जूनला सकाळी ७ वाजल्यापासून एसीबीने ही कारवाई चालू केली आहे. या कारवाईसंबंधी मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे. कारवाई झाल्यानंतर नागरिकांनी महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर फटाके वाजवले आणि अधिकार्यांचा निषेध केला.
संपादकीय भूमिकालाचखोरीत मोठे प्रशासकीय अधिकारी सहभागी असणे, हे भ्रष्टाचाराची समस्या गंभीर बनल्याचे लक्षण ! |