पुणे येथील ‘ससून’मधील रुग्णांना सर्व प्रकारची औषधे रुग्णालयातच मिळणार !

रुग्णालयातच औषधे मिळावीत, यासाठी औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यातील काही औषधांचा पुरवठा झालेला आहे, तर काही औषधांचा पुरवठा १५ दिवसांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

रुग्णवाहिकेअभावी ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !

आर्यन तलांडी असे त्याचे नाव आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने पालकांनी रुग्णालय परिसरात टाहो फोडला होता.

आनंदवनात विवाहितेचा खून !

मृत महिलेचे नाव आरती चंद्रवंशी (वय २४ वर्षे) असे आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे ही घटना घडली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला बोलावण्यात आले आहे.

हिंदु धर्मविरोधकांकडून केल्या जाणार्‍या खोटा प्रचाराविरूद्ध आक्रमक पवित्रा आवश्यक ! – डॉ. भास्कर राजू वी., विश्वस्त, धर्ममार्गम् सेवा  ट्रस्ट, तेलंगाणा

ख्रिस्ती आणि इस्लामी हे पाखंडी आहेत, तर साम्यवादी हे देशद्रोही आहेत. या लोकांची विचारसरणी अमान्य केली पाहिजे. त्यांची खोटी कथानके फेटाळणारे ‘नॅरेटिव्ह’ आपण सिद्ध केले पाहिजे. त्यासाठी सर्व प्रकारचे भेद बाजूला ठेवून हिंदु म्हणून संघटितपणे आपण हे आक्रमक धोरण राबवले पाहिजे.

मोठ्या, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांद्वारे ५५.६० लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण !

जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत झालेला अवेळी पाऊस आणि अतीवृष्टी यांमुळे राज्यातील १६.५५ लाख हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २२.७४ लाख शेतकर्‍यांना १७००.५० कोटी रुपये हानी भरपाई राज्यशासनाने संमत केली.

हिंदु धर्माचरणामागे आध्यात्मिकतेसह वैज्ञानिक विचार ! – श्री वीरभद्र शिवाचार्य महास्वामीजी, बालेहोन्नरू, खासा शाखा मठ, श्रीक्षेत्र सिद्धरामबेट्टा, तुमकुरू, कर्नाटक

हिंदु धर्माचरणामागे  आध्यात्मिकतेसह वैज्ञानिक विचारही आहे. अन्य धर्मीय त्यांच्या धर्माविषयी प्रश्न विचारत नाहीत; पण हिंदु धर्माचरण करण्यापूर्वी प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्याला हिंदूंना धर्माचरणामागील वैज्ञानिक कारणे सांगणे आवश्यक आहे.

पुन्हा महायुतीचे शासन आणण्याचा आमचा निश्चय ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री अमावस्या-पौर्णिमेला पंचतारांकित शेती करायला जातात’, असे विधान ठाकरे यांनी केले होते. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘‘लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी कि नाही ?

राज्य सरकारकडे घोषणांचा पाऊस आणि कार्यवाहीचा दुष्काळ असतो ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

गेल्या २ वर्षांतील घोषणांची किती पूर्तता झाली ?, हे सरकारने खरेपणाने सांगितले पाहिजे, अशी विधाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ जून या दिवशी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

काश्मीरमधील धर्मांधांनी तोडलेली काही मंदिरे सैन्याकडून पुन्हा उभारणी होत आहे ! – मेजर सरस त्रिपाठी

एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाकिस्तानचा एक अधिकारी आला आणि काश्मीरचा नकाशा पाहून त्यांना म्हणाला, ‘ही टोपी तुम्ही काढून द्या.’ त्या वेळी ते त्याला म्हणाले, ‘‘ही टोपी नाही, हे आमचे शीर आहे आणि शीर कुणी काढून देत नाही.’’

हिंदूविरोधी नॅरेटिव्‍ह रचून छत्रपती शिवाजी महाराजांची महानता अल्‍प करण्‍याचे षड्‍यंत्र ! – उदय माहुरकर, माजी माहिती आयुक्‍त, भारत सरकार

हिंदु युवकांमध्‍ये विशेषत: संभ्रम आणि एकमेकांबद्दल तिरस्‍काराची भावना वाढीस लावण्‍यासाठी जातीयवाद, ब्राह्मणवादी पितृसत्ता असे शब्‍द वापरलेे जात आहेत.