Compensation On Removing Hijab : मुसलमान महिलांना मिळणार १४५ कोटी रुपयांची हानीभरपाई !

जमिला क्लार्क आणि अरवा अझीझ अशी महिलांची नावे असून त्यांनी या पोलिसांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यांनी आरोप केला होता की, त्यांना अटक केल्यानंतर ओळखीसाठी त्यांचे छायाचित्र काढावे लागले

Externment Notice To Bajrang Dal : बजरंग दलाच्या दक्षिण कन्नड (कर्नाटक) जिल्हा संचालकाला हद्दपारीची नोटीस !

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात केवळ बजरंग दल आणि विहिंप यांनीच नाही, तर जिल्ह्यातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून विरोध केला पाहिजे. हिंदूसंघटन झाल्यासच हिंदूंवरील असे अन्याय थांबू शकतात, हे हिंदूंनी जाणावे !

India Pakistan Terrorist : (म्हणे) ‘भारतीय हस्तकांनी पाक नागरिकांच्या केलेल्या हत्यांचे पुरावे आहेत !’ – पाकिस्तान

‘आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून मारणार’ या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानाने पाकला मिरच्या झोंबल्या !

Canada India Relation : कॅनडाच आमच्या कारभारात ढवळाढवळ करत आहे !

कॅनडाच्या निवडणुकीत भारताने हस्तक्षेप केल्याचा आरोप भारताने फेटाळत केला आरोप  

The Diary Of West Bengal : ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पाकमधील आतंकवादी संघटनेकडून धमकी

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारही चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये खोडा घालत असल्याचाही निर्मात्यांचा आरोप

कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना जामीन

‘सेन यांनी बराच मोठा कालावधी कारागृहात घालवला आहे. त्यांचे वय बघता त्यांना जामीन मिळवण्याचा हक्क आहे’, असे मत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देतांना नोंदवले.

आचारसंहितेच्या काळात ‘मेट्रो’च्या खांबांवरील विज्ञापनांवर कारवाई करा !

‘मेट्रो’च्या मार्गांवरील खांब तुमच्या मालकीचे असून त्यावर आचारसंहितेचा भंग होईल, असे कोणतेही विज्ञापन करू देऊ नका. विज्ञापन लावल्यास तात्काळ कारवाई करा, अशा आशयाचे पत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून ‘महामेट्रो’ प्राधिकरणाला देण्यात आले आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ५ दिवस सुटी !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुटी घोषित करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या खासगी आस्थापनांसाठी ही सुटी असणार आहे.

सुटीच्या काळात राज्यात १ सहस्र ८८ विशेष बसगाड्या चालवणार !

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळाने राज्यात १ सहस्र ८८ विशेष बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कुख्यात गुंड अरुण गवळी याची कारागृहातून सुटका होणार !

वर्ष २००६ च्या शासन निर्णयानुसार ६५ वय झाल्यावर बंदीवानाला शिक्षेमध्ये सवलत देण्याचे प्रावधान आहे. या प्रावधानाच्या साहाय्याने शिक्षेत सवलत मिळावी, यासाठी अरुण गवळी याने न्यायालयात याचिका केली होती.