समुद्रकिनारे आणि ‘पार्टी लाईफ’ यांच्या पलीकडे पर्यटनाला व्यापक स्वरूप देणे आवश्यक ! – सुनील आंचिपाका, संचालक, गोवा पर्यटन विभाग
समुद्रकिनारे (बीच) आणि ‘पार्टी लाईफ’ (मेजवान्या करणे) यांच्या पलीकडे जाऊन गोव्याच्या पर्यटनाला व्यापक रूप देणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्था, आस्थापने यांच्यासह जनतेच्या मानसिकतेतही पालट होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.