निवडणुकीच्या प्रसारासाठी पैशांचा उपयोग, नियमित १०० कोटी रुपये जप्त !

लोकसभेच्या निवडणुकीत १ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत अवैधरित्या वापरण्यात येत असलेली तब्बल ४ सहस्र ६५० कोटी इतकी रक्कम कह्यात घेण्यात आली आहे. या ४५ दिवसांमध्ये देशात नियमित सरासरी १०० कोटी रुपयांची अवैध रक्कम पकडली जात आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बुलढाणा येथे मिरवणुकीत नाचतांना युवकाची हत्या; युवतीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद…

ऑनलाईन शिकवणीवर्गाच्या माध्यमातून ओळख झालेल्या संशयिताने येथील युवतीला शीतपयेयामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याचे ध्वनीचित्रीकरण प्रसारित करण्याची धमकी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ‘स्वमग्न’ (गतीमंद) मुलांसाठी विशेष शाळा चालू होणार

‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास ५०० हून अधिक स्वमग्न विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर पाठवावे लागत होते; मात्र आता जिल्ह्यातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

२ संशयित नवी मुंबईतून कह्यात, एकाची ओळख पटली !

अभिनेते सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने २ संशयितांना नवी मुंबईतून कह्यात घेतले आहे.

मांगवली येथे अरुणा धरणाच्या कालव्याचे पाईप आगीत जळून खाक

तालुक्यात मांगवली येथे १४ एप्रिल या दिवशी लागलेल्या आगीत अरुणा धरणाच्या कालव्यासाठी ठेवण्यात आलेले पीव्हीसी पाईप जळून खाक झाले.

विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाची कारवाई !

मुळशी तालुक्यात विकासाच्या नावाखाली विनापरवाना चालू असलेल्या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाने मोठी कारवाई केली. प्रशासकीय अनुमतीविना ८०० झाडे तोडणार्‍या विकासावर कारवाई करून वनविभागाने ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

आजच्या संगणकयुगातील दैनंदिन जीवनात नवनाथांचा आधार अनुभवा ! – नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके

नवनाथांनी अवतार घेऊन तप सामर्थ्याचे अलौकिक दर्शन घडवत आपल्यास जीवनोपयोगी संदेश दिले आहेत. ‘या संदेशरूपाने नवनाथांचा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या’, असे आवाहन नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाशी निगडित संस्थेच्या अधिकार्‍यांच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंद

‘फर्निचर’ पुरवण्यासाठी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप

सरकारी शाळांमधील विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा गोवा शासनाचा स्तुत्य निर्णय !

केंद्रातील शिक्षण मंत्रालय ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ योजनेच्या अंतर्गत निधी पुरवणार

विशेष सरकारी अधिवक्त्यांना वेळ नाही म्हणून खटला लांबवू नये, तसेच जामीन अर्जावरच्या सुनावण्या प्रलंबित राहू नयेत !

अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायालयाला सांगितले, ‘‘या प्रकरणात ३-३ सरकारी अधिवक्ते असतांनाही विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर जाणीवपूर्वक खटल्यांच्या दिनांकांना अनुपस्थित राहून खटला लांबवत आहेत, याची न्यायाधिशांनी नोंद घ्यावी.