अकोला येथे अटकेतील गुंडाच्या साथीदाराकडून कारागृह निरीक्षकाला जिवे मारण्याची धमकी !
कुख्यात गुंड गजानन कांबळे याला कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदारांनी कारागृह निरीक्षकालाच धमकी देत धक्काबुक्की केली.
कुख्यात गुंड गजानन कांबळे याला कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदारांनी कारागृह निरीक्षकालाच धमकी देत धक्काबुक्की केली.
कोकण रेल्वे मार्गावर सुट्यांचा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ वेळा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ११ एप्रिल २०२४ पासून या विशेष गाड्या चालू होतील.
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव इथे सकाळी साडेआकराच्या सुमारास रिक्शा आणि शिवशाही बस यांचा अपघात होऊन ३ जणांचा मृत्यू झाला.
लव्ह, लँड, योग, हलाल, इतिहास या जिहादांच्या जोडीला त्यात ‘ड्रेस’ जिहादची भर पडणे भारतासाठी धोकादायक !
‘करवीर गर्जना ढोल पथका’च्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करणार्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. ‘प्रत्येक लहान कंत्राटावर आम्ही लक्ष ठेवू शकत नाही’, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
श्री महालक्ष्मीदेवी शक्तीपिठ आणि पर्तगाळी मठाचा स्नेहबंध भविष्यात शाळा, बालसंस्कारवर्ग, मठशाखा उभारणी यांसह विविध सामाजिक उपक्रमांनी दृढ करू, असे प्रतिपादन गोवा येथील ‘गोकर्ण पर्तगाळी मठा’चे २४ वे मठाधीश श्री श्रीपाद विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी केले.
मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७ एप्रिलला घेण्यात आलेल्या ‘रन फॉर वोट लोकशाही दौड’मध्ये ६ सहस ३५९ नागरिक सहभागी झाले.
महाराष्ट्रातील प्राचीन अशा जागरण-गोंधळ या धार्मिक विधीमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय चालू केला असल्याची तक्रार ‘गोंधळी समाजसेवा संघटने’ने जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर पोलिसांनी गोवा बनावटीच्या मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात ५ एप्रिलला रात्री कारवाई केली.