कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना जामीन

आरोपी शोमा सेन

नागपूर – कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी आणि नागपूर विद्यापिठातील माजी प्राध्यापिका शोमा सेन यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने ५ एप्रिल या दिवशी अटींसह संमत केला आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायदा (युएपीए) अंतर्गत ६ जून २०१८ या दिवशी अटक केली होती.

१. अटकेत असलेल्या सेन यांना आणखी काही काळ कह्यात ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांचे अधिवक्ता ग्रोवर यांनी न्यायालयात सांगितले होते. अन्वेषण यंत्रणांनी नक्षलवादी चळवळीशी त्यांच्या संबंधाविषयी पुरावे सादर केले नसल्याचा युक्तीवाद अधिवक्ता ग्रोवर यांनी केला.

२. ‘सेन यांनी बराच मोठा कालावधी कारागृहात घालवला आहे. त्यांचे वय बघता त्यांना जामीन मिळवण्याचा हक्क आहे’, असे मत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देतांना नोंदवले.

३. कोरेगाव भीमा प्रकरणातील १६ पैकी शोमा सेन या सहाव्या आरोपी आहेत. यापूर्वी या प्रकरणात सुधा भारद्वाज, आनंद तेलतुंबडे, वर्नन गोन्साल्विझ, अरुण फेरेरा, वरवरा राव आणि गौतम नवलखा यांना जामीन संमत झाला आहे.