मंदिर भग्नावस्थेत
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल भागात एक शिवमंदिर सापडले आहे. हे शिवमंदिर वर्ष १९७० मध्ये बांधण्यात आले होते; मात्र या भागात मुसलमानांची संख्या वाढल्याने हिंदूंना पळून जावे लागले आणि मंदिर पूर्णपणे मोडकळीस आले. आता पुन्हा प्रशासनाने या शिवमंदिरावर लक्ष केंद्रित केले आहे.
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील नगर कोतवाली भागातील मोहनलाल लड्डावाला परिसरात ५४ वर्षांपूर्वी शिवमंदिराची स्थापना करण्यात आली होती. त्या वेळी हा भाग हिंदुबहुल होता; पण नंतर जेव्हा ९० च्या दशकात श्रीरामजन्मभूमी आंदोलन तीव्र झाले तेव्हा येथील परिस्थिती पालटली. दंगली आणि मुसलमानांची वाढती लोकसंख्या यांमुळे हिंदूंनी या भागातून पलायन केले. त्या वेळी या मंदिरातून शिवाची मूर्ती आणि इतर धार्मिक चिन्हेही हटवण्यात आली. आता हे मंदिर भग्नावस्थेत आहे.
सरकारने या मंदिराचा जीर्णोद्धार करावा ! – भाजपचे नेते सुधीर खाटीक
या परिसरातून स्थलांतरित झालेले भाजपचे नेते सुधीर खाटीक यांनी सांगितले की, ९० च्या दशकात या परिसरात मांसाची दुकाने चालू झाली आणि धार्मिक वातावरण बिघडले. अशा परिस्थितीत हिंदूंनी मंदिरातील मूर्ती काढून दुसर्या ठिकाणी स्थापित केल्या. आज मंदिरावर आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण केले आहे. सरकारने या मंदिराचा जीर्णोद्धार करावा. धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण हाच राष्ट्राच्या सुरक्षेचा आधार आहे.