कोल्हापूर येथील श्री जोतिबाची वर्षातील सर्वांत मोठी चैत्र यात्रा उत्साहात पार पडली !

कोल्हापूर येथे जोतिबा देवाची सर्वांत मोठी चैत्र पौर्णिमेची यात्रा भरते. यासाठी गेल्या ४ दिवसांपासून बैलगाडी, खासगी वाहने, बस गाड्यांमधून लाखो भाविक त्यांच्या गावाच्या मानाच्या सासनकाठ्या घेऊन डोंगरावर आले होते.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात १७७ ठिकाणी गदापूजन !

हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहभागाने सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित होण्यासाठीच्या आवेदनावर युक्तीवाद चालू

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील एक संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन अर्ज रहित होण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने आवेदन सादर करण्यात आले आहे.

शिखर बँकेतील कथित घोटाळ्याची चौकशी बंद करण्याची मुंबई पोलिसांची मागणी !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत कोणत्याही प्रकारे अनियमितता नाही. त्यामुळे बँकेतील कथित घोटाळ्याचे अन्वेषण बंद करावे, अशी विनंती राज्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष न्यायालयाकडे केली आहे.

पोलिसांप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनाही मिळणार गणवेश !

खाद्यपदार्थ आणि औषधे यांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेले अन्न अन् औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही पोलिसांप्रमाणे गणवेश दिला जाणार आहे.

आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुखपदी ३ जणांची निवड !

जगद‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा ३३९ वा आषाढी वारी पालखी सोहळा २८ जून २०२४ या दिवशी आणि प्रस्थान दुपारी २ वाजता पार पडणार आहे.

गुप्त धन सापडल्याचा बनाव करून खोटे सोने विकणार्‍या मुसलमानाला अटक !

विविध क्लृप्त्या काढून जनतेला फसवणारे धर्मांध गुन्हेगार !

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. प्रवचन झाल्यावर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताच्या नामजपाविषयी सविस्तर जाणून घेतले.

चाकण येथे मक्याच्या शेतात गांजाचे पिक लावणार्‍या शेतकर्‍याला अटक !

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, चाकण पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्‍हाड यांना आगरवाडी रस्त्यावरील एका शेतात गांजा लावला असल्याची माहिती मिळाली.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत १०५ ठिकाणी गदापूजन !

श्री संकटमोचन हनुमान मंदिर, कण्णीनगर, दहिटणे येथे सनातनच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या शुभहस्ते गदापूजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, श्री. प्रशांत वालीकर हेही उपस्थित होते.