Compensation On Removing Hijab : मुसलमान महिलांना मिळणार १४५ कोटी रुपयांची हानीभरपाई !

अटकेतील २ मुसलमान महिलांचे छायाचित्र काढण्यासाठी पोलिसांनी त्यांचा हिजाब काढल्याचे प्रकरण

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांकडून डोके आणि मान झाकण्यासाठी वापरले जाणारे वस्त्र)

भरपाई मिळणार असलेल्या महिला : जमिला क्लार्क आणि अरवा अझीझ

न्यूयॉर्क (अमेरिका) : येथील पोलिसांनी वर्ष २०१८ मध्ये २ मुसलमान महिलांना हिजाब काढायला लावले होते. यामुळे आता या महिलांना हानीभरपाई म्हणून १४५ कोटी रुपये मिळणार आहेत. जमिला क्लार्क आणि अरवा अझीझ अशी महिलांची नावे असून त्यांनी या पोलिसांच्या विरोधात तक्रार केली होती. त्यांनी आरोप केला होता की, त्यांना अटक केल्यानंतर ओळखीसाठी त्यांचे छायाचित्र काढावे लागले. यासाठी त्यांना त्यांचा हिजाब काढण्यास भाग पाडण्यात आले, ज्यामुळे त्यांना लाज वाटली. ते अपमानास्पद क्षण शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. त्या वेळी पोलीस ठाण्यात अनेक पुरुष पोलीस अधिकारी आणि ३० बंदीवान उपस्थित होते.

क्लार्क यांना ९ जानेवारी २०१७ या दिवशी, तर अझीझ यांना ३० ऑगस्ट २०१७ या दिवशी अटक करण्यात आली होती.