‘कीबोर्ड’च्या ‘स्ट्रोक’वरून भ्रमणभाषमधील ‘बँकिंग’ आणि ‘सोशल मीडिया पासवर्ड’ चोरण्याची नवीन पद्धत !

दिग्गज स्मार्टफोनचे ब्रँड सॅमसंग, शाओमी, विवो आणि ओप्पो यांविषयी एक खुलासा झाला आहे, ज्यात ‘की बोर्ड’च्या ‘स्ट्रोक’वरून भ्रमणभाषमधील ‘बँकिंग’ (अधिकोषाच्या संदर्भात ऑनलाईन प्रक्रिया) आणि ‘सोशल मीडिया पासवर्ड’ चोरले जात आहेत.

मराठवाड्यात ‘जलजीवन’वर १ सहस्र ६७९ कोटी रुपये खर्च !

मराठवाड्यात ‘जलजीवन मिशन’अंतर्गत ‘नळ पाणीपुरवठा योजने’च्या कामांसाठी दीड वर्षात तब्बल १ सहस्र ६७९ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, तसेच ७ सहस्र १७३ पैकी केवळ १ सहस्र ६८७ गावांतील कामेच पूर्ण झाली आहेत.

पुणे येथील ‘डी.एस्.के.’ यांच्या ४५९ मालमत्ता लिलावास योग्य !

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी आणि त्यांच्या विविध आस्थापनांच्या ४५९ मालमत्ता जप्त आहेत. ‘त्या लिलावास योग्य आहेत’, असा अर्ज आणि प्रमाणपत्र मुंबईच्या विशेष न्यायालयात सादर केले गेले.

बेस्टच्या किमान आणि वातानुकूलित गाड्यांच्या तिकिट दरात वाढ !

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे बेस्टचे किमान तिकीट ७ रुपये, तर वातानुकूलित गाड्यांचे किमान तिकीट १० रुपये इतके होणार आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय आवेदनावरील तालुका अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा मार्ग मोकळा !

राज्यशासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षकांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षा’च्या आवेदनाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी अधिकार दिले होते.

अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेसच्या सोशल मिडिया चालवणार्‍यांवर गुन्हा !

काँग्रेसकडे आता पर्यायच राहिला नसल्याने विरोधकांच्या अशा खोट्या चित्रफीती करणेही तिने चालू केले आहे !

उत्तर पश्चिम (वायव्य) येथील महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना !

उत्तर-पश्चिम (वायव्य) येथून लोकसभेसाठी महायुतीची उमेदवारी रवींद्र वायकर यांना देण्यात आली आहे. शिवसेनेच्या ‘एक्स’ खात्यावर वायकर यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन

लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे या दिवशी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीसदलाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी संचलन करण्यात आले. 

चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात २९८ उमेदवार रिंगणात !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान १३ मे या दिवशी  ११ मतदारसंघात होणार आहे. या सर्व मतदारसंघांत मिळून एकूण २९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

‘सोहम्’ चित्रपट समाजातील सर्व थरापर्यंत पोचवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी सक्रीय व्हावे ! – उज्ज्वल नागेशकर

‘सोहम्’ चित्रपटामधून सिद्धगिरी कणेरी मठाच्या १ सहस्र ५०० वर्षांची परंपरा सक्षमपणे दाखवण्यात आली आहे. यात आध्यात्मिक परंपरेसह समाज उपयोगी सेंद्रीय शेती, शिक्षण, वैद्यकीय अशा पैलूंच्या योगदानाची ही यथायोग्य योग्यपणे नोंद घेण्यात आली आहे.