भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी घोषित !

सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासमवेत होणार आहे. शिंदे हे शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

पोलीस भरतीची सिद्धता करणार्‍या तरुणीवर बलात्कार करणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद !

अशा वासनांध पोलिसांना बडतर्फच करायला हवे !

यंदाचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार अमिताभ बच्चन यांना !

महाराष्ट्राचा मानाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ विशेष पुरस्कार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना घोषित करण्यात आला आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता.

उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

उन्हातून मुलांना शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना सुटी घोषित करण्याचे निर्देश द्यावेत, असे या संदेशात राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा ! – विश्वजित कदम, आमदार, काँग्रेस

‘सांगलीविषयी लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा’, असे विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी १६ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष आवेदन भरले !

काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या सांगली येथे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून सांगली मतदारसंघातून अपक्ष आवेदन भरले आहे. महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाकडून सांगली येथे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती.

दोंडाईचा (जिल्हा धुळे) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

धर्मांधांच्या दृष्टीने मुसलमान सोडून अन्य सगळे शत्रूच आहेत, हे यावरून लक्षात येईल !

समाजवादी पक्षाचे उमेदवार मोहिबुल्ला नदवी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्याचे टाळले !

‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे याविषयी तोंड उघडतील का ?

भारताने सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक पावले उचलली ! – अमेरिका

भारत एक जागतिक नेता म्हणून उदयास येत असून भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्याने आवश्यक पावले उचलली आहेत, असे वक्तव्य लेफ्टनंट जनरल जेफरी क्रूस यांनी केले.

समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध ! – माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

भाजप घटनेत पालट करत आहे, असा आरोप सातत्याने काँग्रेस करते; मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ७३ वेळा घटना दुरुस्त्या या काँग्रेसने केल्या आहेत.