Smart City Panjim : न्यायाधीश शहराची पहाणी करत असतांना ‘स्मार्ट सिटी’चे सल्लागार कुठे होते ?

प्रकल्प रेंगाळल्याने पणजीतील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नोंदवून संबंधित यंत्रणांना धारेवर धरले आहे !

सासवड (जिल्हा पुणे) येथील मतदान यंत्र चोरी प्रकरणातील ३ अधिकार्‍यांचे निलंबन रहित !

निलंबन रहित होऊन कामावर रुजू झालेल्या अधिकार्‍यांनी पुन्हा मतदान यंत्रांची चोरी केली, तर त्याला उत्तरदायी कोण ?

पोलिसांच्या अन्वेषणात एवढा विलंब का ? – सात्यकी सावरकर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण केले जात आहे; परंतु या अन्वेषणात विलंब होत असल्याची तक्रार सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी केली आहे.

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) नगरपरिषदेचा पाण्याचा बंब दुरुस्त न केल्यास आंदोलन करणार ! – संतोष परब, युवासेना

अशी चेतावणी द्यावी लागणे नगरपरिषद प्रशासनाला लज्जास्पद ! असा हलगर्जीपणा करणारे आपत्काळात जनतेचे रक्षण कसे करणार ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा !; संजय निरूपम शिवसेनेत जाण्याची शक्यता !…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा ‘टीझर’ (विज्ञापन) प्रसारित करण्यात आला आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर येण्याचे आमंत्रण यात देण्यात आले आहे.

Mhadei Water Dispute : संयुक्त पहाणीच्या वेळी कर्नाटकचे काम बंद पाडण्याची मागणी करणार ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर,गोवा

सरकारने ‘म्हादई प्रवाह’ला २२ मार्च या दिवशी चौथे पत्र पाठवले आहे. म्हादईच्या ठिकाणी कर्नाटकने काम चालू ठेवल्याने गोवा सरकारने वेळोवेळी तक्रार केलेली आहे. ‘म्हादई प्रवाह’चे अध्यक्ष नेमकी पहाणी कुठे करायची याविषयी निर्णय घेणार आहेत.

Goa Water Resources : गोव्यातील धरणांत २ मास पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

राज्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. यामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यासही चिंतेचे कारण नाही. गेल्यावर्षी जून मासाच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मौसमी पावसाचे आगमन झाले होते.

असे असतात हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘जन्मांधाने ‘दृष्टी, दिसणे असे काही आहे’, असे मानणे ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणावे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म दृष्टी असे काही आहे’, असे मानणे, ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दाखवणारी घटना जाणा !

पुणे येथील मंगळवार पेठेतील ‘यारखान कॉम्प्लेक्स’मध्ये वास्तव्य करणार्‍या मीरा चित्रावार या गरोदर हिंदु महिलेवर धर्मांधांनी आक्रमण करून तिच्या पोटावर लाथा-बुक्के मारले. यामुळे तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला.

संपादकीय : अमेरिकेची अनास्था !

मानवतावादाची पुरस्कर्ती; पण हिंदुविरोधी घटनांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणारी अमेरिका म्हणूनच हिंदुद्वेषी ठरते !