सांगली येथे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक !

काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्याचे सर्व नेते आणि पदाधिकारी यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन ‘महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडणे हा निर्णय आपल्याला पचनी पडलेला नाही’, असे म्हटले आहे.

केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुन्हा एकदा श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे अशास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचे निश्‍चित !

केंद्रीय पुरातत्व विभाग १४ आणि १५ एप्रिल या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन करणार आहे. या कालावधीत भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेता येणार नाही.

प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणार्‍या कारखान्यांवर धाडी !

प्लास्टिक पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणार्‍या कारखान्यांवर उल्हासनगर महानगरपालिका, प्लास्टिक निर्मूलन पथक, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी धाडी घातल्या.

पुणे येथे ३० वर्षांपूर्वी दुरुस्ती अर्ज देऊनही ८५ वर्षीय वॉल्टर सलढाणा यांना मतदान ओळखपत्र मिळाले नाही !

यासाठी उत्तरदायी कोण आहेत ? हे निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे महत्त्वाचे आहे.

स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला हवेच्या गुणवत्तेचे सर्वेक्षण करण्याची पुणे महानगरपालिकेची विनंती !

शहरातील स्मशानभूमीमुळे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत, त्यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. स्मशानभूमीसाठी वायू प्रदूषणाचे नियम नसल्याविषयी नागरिकांनी चिंता व्यक्त केली.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्याकडून विद्यार्थ्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत असल्याचा महायुतीचा आरोप !

महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये निवडून येण्याची धमक नसल्यानेच महाविद्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी यांवर आरोप करत महायुतीच्या नेत्यांनी संस्थाचालक आणि प्राचार्यांना सुनावले.

पुणे येथे भरारी पथकाने केली ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन शासनाधीन !

पकडण्यात आलेली रक्कम एवढी आहे, तर जप्त न झालेली केवढी असेल ? निवडणूक म्हणजे पैसे वाटण्याची प्रक्रिया झाली आहे.

डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन !

छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी विकणार्‍या दुकानदाराचे केले प्रबोधन !

मोशी (पिंपरी) येथील जलवाहिनीला गळती; सहस्रो लिटर पाणी वाया !

जलवाहिनीला गळती कशी लागते ? महापालिका प्रशासन वेळोवेळी तिची पडताळणी करत नाही का ?