श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये सहस्रो भाविकांची गर्दी !

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने १० एप्रिल या दिवशी भाविकांनी ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय’, चा जयघोष करत सहस्रो भाविकांनी दर्शन घेतले.

वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष हिंदु विधीज्ञ परिषद

वैचारिक आतंकवाद हा भयंकर असून तो देशाच्या अर्थव्यवस्थेसह आपली संस्कृती आणि स्वाभिमान यांना उद्ध्वस्त करतो. या आतंकवादाला कुठला रंग नाही. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात प्रत्येकाने प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य दाखवावे…

सातारा येथील श्री काळाराम मंदिरात ‘रामनवमी उत्सवा’स प्रारंभ !

सर्व कार्यक्रम भाविक-भक्तांच्या देणग्यांमधून पार पाडले जातात. तरी समस्त श्रीरामभक्तांनी या उत्सवामध्ये यथाशक्ती सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर विश्वस्त मोहनभाई शहा यांनी केले आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गुढीपूजन !

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी सामूहिक गुढीपूजन करण्यात आले, तसेच शेकडो धर्मप्रेमींनी रामराज्याची प्रतिज्ञा घेतली.

प.पू. प्रमोद केणे काकालिखित आध्यात्मिक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चौल (अलिबाग) येथे ‘जय गिरनारी शिव दत्त मंदिर ट्रस्ट’चे प.पू. प्रमोद केणेकाका यांनी लिहिलेल्या ‘वेड्या पिराची आत्मगाथा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला.

तुर्भे गाव येथे विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने रामनवमी उत्सवाचे आयोजन !

तुर्भे गाव येथे विश्वनाथ कृष्णाजी सामंत ट्रस्टच्या वतीने रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संत श्री रामतनुमाता मंदिर येथे श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराजांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या उत्सवाचे हे ८४ वे वर्ष आहे.

शिक्षक स्थानांतर प्रकरणात आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली !

शिक्षकांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? दुसर्‍या शाळेत गेल्यावर ते त्याच चुका करत रहाणार ! स्थानांतरासमवेत त्यांना अन्य शिक्षा केली, तर त्यांना चुकीची जाणीव होईल.

लव्ह जिहाद पसरवण्यासाठी गावांकडे धर्मांधांचा जोर ! – विक्रम पावसकर, हिंदू एकता आंदोलन, सातारा जिल्हाध्यक्ष

भगवा ध्वज आणि हिंदु राष्ट्र हेच हिंदू एकता आंदोलनाचे ध्येय असून भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. यासाठी प्रथम ‘सर्वधर्मसमभाव’ नावाची कीड ठेचून काढली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रण कायदा झालाच पाहिजे, असे श्री. विक्रम पावसकर यांनी सांगितले.

कोल्हापूर येथे बनावट नोटांचे मुद्रण करणार्‍या टोळीस अटक !

२८ मार्चला राजारामपुरी येथील एका ‘ए.टी.एम्.’ केंद्राच्या ‘डिपॉझिट’ यंत्रात ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जमा झाल्याची तक्रार प्रविष्ट झाली होती.

देशाच्या अखंडतेसाठी शिवछत्रपतींचे विचार मार्गदर्शक ! – छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार, भाजप

खासदार भोसले पुढे म्हणाले, ‘‘गुढीपाडव्यानिमित्त मी राजघराण्याच्या वतीने समस्त महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा देतो. तसेच प्रत्येकाच्या मनातील स्वप्न पूर्ण व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो.