Patiala Court Orders ‘Delhi Art Gallery’ : देहलीतील पटियाला न्यायालयाने दिला ‘दिल्ली आर्ट गॅलरी’चे सीसीटीव्ही चित्रीकरण सुरक्षित ठेवण्याचा आदेश !

हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांची वादग्रस्त चित्रे गुपचूप हटवून पुराव्यांमध्ये फेराफेरी केल्याचे प्रकरण

हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांची वादग्रस्त चित्रे !

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

नवी देहली : हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदूंच्या देवतांचे आक्षेपार्ह चित्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्याच्या प्रकरणी हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या तक्रारीवर येथील पटियाला हाऊस न्यायालयातील महानगर दंडाधिकारी साहिल मोंगा यांनी ४ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीतील दिल्ली आर्ट गॅलरीतील सीसीटीव्ही चित्रीकरण सुरक्षित ठेवण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. पुढील सुनावणी ४ जानेवारी २०२५ या दिवशी होणार आहे.

हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी यावर म्हटले की, हा आदेश हिंदु धर्मरक्षणासाठी लढणार्‍या हिंदु संघटनांचा मोठा विजय आहे. या आदेशामुळे सत्य उघडकीस येण्यासाठी साहाय्य होणार आहे. यात आमची शासनाकडे मागणी आहे की, गुन्हा लपवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

श्री. नरेंद्र सुर्वे

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –

काय आहे प्रकरण ?

‘दिल्ली आर्ट गॅलरी’तील ‘हुसेन : द टाइमलेस मॉडर्निस्ट’ (हुसेन : कालातीत आधुनिकतावादी) या प्रदर्शनात हिंदुद्वेषी हुसेन यांनी रेखाटलेली देवतांची नग्न आणि आक्षेपार्ह चित्रे समाविष्ट करण्यात आली होती. एका चित्रामध्ये श्री गणपति याच्या मांडीवर नग्न स्त्री (कदाचित् रिद्धि/सिद्धि) दाखवण्यात आली होती. दुसर्‍या चित्रामध्ये भगवान हनुमान एका नग्न स्त्रीला (कदाचित् सीता माता) हातात धरून उड्डाण करतांना दिसत होते. आणखी एका चित्रामध्ये शंकराच्या मांडीवर नग्न स्त्रीला अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने दाखवले होते. ही चित्रे हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्यासाठी तयार करण्यात आल्याचे स्पष्ट आहे. समितीने भारतीय दंड विधान कलम २९५(अ) आणि न्याय संहिता कलम २९९ अंतर्गत आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.

‘दिल्ली आर्ट गॅलरी’चा खोटारडेपणा !

तक्रारीनंतर गॅलरी व्यवस्थापनाने वादग्रस्त चित्रे गुपचूप काढून टाकली; परंतु पोलिसांच्या चौकशीत ही चित्रे प्रदर्शित असल्याचे नाकारले. हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा आणि इतरांनी पटियाला न्यायालयात सीसीटीव्ही चित्रीकरण सुरक्षित ठेवण्याची आणि गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. माननीय न्यायालयाने ही मागणी मान्य करून देहली पोलिसांना निर्देश दिले की, संबंधित कालावधीतील चित्रीकरण सुरक्षित ठेवावे आणि अहवाल सादर करावा.


हे वाचा –

HJS Protests Against MF Husain Paintings : हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर ‘दिल्ली आर्ट गॅलरी’मधील हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी रेखाटलेली देवतांची नग्न चित्रे गुपचूप हटवली !
https://sanatanprabhat.org/marathi/862553.html


या लढ्यात सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता मकरंद आडकर, अधिवक्ता शांतनु, अधिवक्ता केसरी, अधिवक्ता विक्रम, अधिवक्ता यादवेंद्र, सनातन स्वाभिमान सभेचे अध्यक्ष ब्रिजेश शर्मा आणि समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांचा समावेश आहे.