सातारा-पुणे महामार्गावर १ एप्रिलपासून सुधारित पथकरवाढ लागू !

सातारा-पुणे महामार्गावरील एस्. टोल रोड प्रा. लि. आणि महामार्ग प्राधिकरण यांनी पथकरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून सुधारित पथकरवाढ लागू करण्यात आली आहे.

सनातन संस्थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्यात्मिक कल्याण करणारे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

३१ मार्च या दिवशी जळगावमधील व्यावसायिक नीलेश पवार यांच्या कार्यालयात ‘पत्रकार – संपादक मुक्त संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी पत्रकारांशी संवाद साधला

चहाचे मळे राम सातपुतेंच्या नावावर करण्याचे काँग्रेसचे आव्हान

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदें यांच्या दक्षिण आफ्रिकेतील चहाच्या मळ्यांची कागदपत्रे दाखवा, जर त्यांनी कागदपत्रे दाखवली, तर चहाचे मळे राम सातपुते यांच्या नावावर करू, असे आव्हान सोलापूर काँग्रेसने भाजप उमेदवार राम सातपुते यांना दिले आहे.

गुढीपाडव्यापासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांच्या ‘श्री रामोत्सव २०२४’स प्रारंभ !

गुढीपाडवा म्हणजेच ९ एप्रिलपासून ‘श्री रामदेव तासगाव’ यांचा ‘श्री रामोत्सव २०२४’ प्रारंभ होत असून २० एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये रेल्वेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाला प्रवाशांकडून चोप !

प्रवाशांच्या मारहाणीत घायाळ झालेल्या नूर याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

नाशिक येथे माजी सैनिकांना १ कोटी ३८ लाख रुपयांचा गंडा घालणार्‍याला पणजी येथे अटक !

नेपाळ येथे पलायन करतांना पोलिसांची कारवाई !

‘जलजीवन मिशन’ योजनेच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये सरकारी भूमीचा अडथळा !

मार्च अखेरपर्यंत सर्व घरांमध्ये घरपोच पाणी देण्याच्या ‘जलजीवन मिशन’ योजनेच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये सरकारी गायरान भूमी मिळत नसल्याने योजनांच्या कार्यवाहीमध्ये अडथळे येत आहेत.

पुणे येथील ससून रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू !

सरकारी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उंदीर चावून रुग्णाचा मृत्यू होणे, हे रुग्णालय आणि प्रशासन यांसाठी लज्जास्पद !

मुंबईत वीजदरात वाढ !

वीज वितरण आस्थापनांच्या वीजदरांची निश्चिती ५ वर्षांनी होते. ‘बेस्ट’ उपक्रमाची वाढ प्रामुख्याने ० ते १०० आणि १०१ ते ३०० युनिट वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांच्या दरात आहे.

राजेंद्र जोशी यांची भाजप पूर्व मंडल मिरज शहर चिटणीसपदी निवड !

त्यांना निवडीचे पत्र नुकतेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते देण्यात आले.