सुटीच्या काळात राज्यात १ सहस्र ८८ विशेष बसगाड्या चालवणार !

राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय !

मुंबई – उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने राज्य परिवहन (एस्.टी.) महामंडळाने राज्यात १ सहस्र ८८ विशेष बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गर्दीच्या मार्गांवर मध्यवर्ती कार्यालयांकडून ४९६ बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई प्रदेशातून २११, पुणे ३३२, छत्रपती संभाजीनगर २४९, नाशिक १९९, अमरावती ५१ आणि नागपूर प्रदेशातून ४६ विशेष गाड्या धावतील. प्रत्येक विशेष गाडी सरासरी ४५० किलोमीटर अंतर कापणार आहे. यामुळे सुमारे ५ लाख किलोमीटरची प्रवासी वाहतूक करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे, असे वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.