Action Against Illegal Construction : सांकवाळ (गोवा) कोमुनिदादकडून ६२ अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाईला प्रारंभ

अनधिकृत घरांना वीज आणि पाणी यांचा पुरवठा देणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

Indian Navy Day 2023 Reharsals : नौदल दिनानिमित्त तारकर्ली (मालवण) येथे नौदलाच्या चित्तथरारक कसरती !

नौदल दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही केंद्रीय आणि राज्यातील काही मंत्री उपस्थित रहाणार आहेत.

सनातन धर्माला संपवण्याचे ‘हेट स्पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच्.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची भाषा देशात काही दिवसांपूर्वी सनातन धर्मद्वेष्ट्यांकडून करण्यात आली. महाराष्ट्रात याविषयी आतापर्यंत १२१ ठिकाणी तक्रारी प्रविष्ट केल्या

पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्यास महाराष्ट्रातील शाळा देशात प्रथम दर्जाच्या ठरतील ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

आतापर्यंत राज्यातील शाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा का झाल्या नाहीत ? हेही पहाणे आवश्यक !

अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाचे अहिल्यानगर येथील श्री विशाल गणपति मंदिरात पूजन !

२६ नोव्हेंबरला पुणे येथून नगरला आणण्यात आलेल्या अक्षतांच्या कलशाचे पूजन रात्री ७.३० वाजता विशाल गणपति मंदिर माळीवाडा येथे श्री विशाल गणपति मंदिराचे महंत संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

ओझर येथे होणार्‍या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या निमित्ताने अमरावती येथे पत्रकार परिषद

या परिषदेला अमरावती जिल्ह्यातील विविध मंदिरांचे ४४ हून अधिक विश्वस्त आणि प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती या परिषदेमधून देण्यात आली.

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासूनच !

२९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुटी वगळता हे अधिवेशन एकूण १० दिवस चालणार आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून ३ सहस्र २६९ दुकाने आणि आस्थापने यांची पडताळणी !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारी १७६ दुकाने आणि आस्थापने यांवर कारवाई करण्यात आली.

नागरिकांसह विविध संस्था, संघटना यांच्या सहभागाने श्रीरामनामाचा भव्य जागर होणार !

अयोध्येमध्ये २२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीराममंदिराचे लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याचे शहरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम यांच्या माध्यमातून स्वागत करणार आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी दिली आहे.

नाशिक येथे मनसेचे मराठी भाषेत पाट्यांसाठी आंदोलन !

नाशिकरोड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी इंग्रजी भाषेत पाट्या असलेल्या दुकानांसमोर घोषणा देत आंदोलन केले. यात प्रतीकात्मक इंग्रजी फलकांच्या छायाचित्राला काळे फासण्यात आले.