अमरावती जिल्ह्यातून ४४ हून अधिक मंदिर विश्वस्त होणार सहभागी

अमरावती – २ आणि ३ डिसेंबर या दिवशी ओझर येथे मंदिर संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. त्याची माहिती देण्यासाठी येथील श्री महाकाली शक्तीपीठ येथे मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला अमरावती जिल्ह्यातील विविध मंदिरांचे ४४ हून अधिक विश्वस्त आणि प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती या परिषदेमधून देण्यात आली. या परिषदेला महाकाली शक्तीपिठाचे पीठाधिश्वर १००८ श्री शक्तीजी महाराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे, मंदिर महासंघाचे श्री. अनुप जयस्वाल, श्री. विनित पाखोडे, श्री. आशिष मारूडकर उपस्थित होते.
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला