मराठी भाषेत नामफलक लावण्याचे प्रकरण
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने आणि आस्थापने यांवर मराठी भाषेत नामफलक लावले का ? याची पडताळणी करण्यासाठी महापालिकेच्या पथकाने ३ सहस्र २६९ दुकाने आणि आस्थापने यांना भेटी दिल्या. त्यात ३ सहस्र ९३ नामफलक मराठी भाषेत आढळले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारी १७६ दुकाने आणि आस्थापने यांवर कारवाई करण्यात आली.