मुंबई – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. २९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुटी वगळता हे अधिवेशन एकूण १० दिवस चालणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांसह विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते उपस्थित होते. यापूर्वी हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून चालू होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते; मात्र अधिवेशन ७ डिसेंबरपासूनच होणार असल्याचा निर्णय विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम करण्यात आला.