दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दुचाकींच्या चोरीत वाढ !; परीक्षेतील अपयशामुळे आलेल्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या !…

एका रिक्शासह तीन दुचाकी चोरांनी पळवल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रतिदिन २ दुचाकींची चोरी केली जात आहे.

अशा दलालांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम करून देण्याचे आमीष दाखवून दलालाने ६ जणांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांचे नारायणगाव येथील शिष्य शशिकांत मनोहर ठुसे (वय ८१ वर्षे ) यांचे निधन !

सनातन परिवार ठुसे आणि मरकळे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ३० नोव्हेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता मीनानदी तीरावर हरिस्वामी मंदिराजवळ त्यांचे अंत्यविधी होणार आहेत. 

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त श्रीराम साहित्य विशेषांकांचे ‘ई-बुक’ प्रकाशित करणार !

अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या निमित्ताने विश्व हिंदु परिषद महाराष्ट्र-गोवाद्वारे साहित्यांजली उपक्रमाअंतर्गत श्रीराम साहित्य विशेषांकांचे ‘ई-बुक’ प्रकाशित करण्यात येत आहे

कुटुंबातील भ्रष्टाचार्‍याला विरोध करणे, ही साधनाच आहे !

‘आपला नवरा भ्रष्टाचारी आहे, असे कळल्यावर त्याची धर्मपत्नी आणि जवळचे नातेवाईक यांनी त्याला पापापासून वाचवण्यासाठी त्याची समजूत घालणे, त्याच्या पापाचा पैसा न स्वीकारणे इत्यादी प्रयत्न करावेत. त्यानेही त्याच्यात पालट न झाल्यास त्याच्या विरोधात तक्रार करावी, म्हणजे पापात सहभागी झाल्याचे पाप त्यांना लागणार नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आज सांगली येथे ‘बृहत्-त्रयीरत्न वैद्यराज आ.वा. दातारशास्त्री चौक’ नामकरण सोहळा !

बृहत्-त्रयीरत्न वैद्यराज आत्मराज वामन दातारशास्त्री हे भारतातील आयुर्वेद क्षेत्रातील आदरणीय व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी आयुर्वेद शास्त्रात संशोधन केले आणि त्यातून ‘पांचभौतिक चिकित्सा प्रणाली’ उदयास आली.

‘सिंहगड इन्स्टिट्यूट’चे संस्थापक मारुति नवले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद !

प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’चे संस्थापक मारुति नवले यांच्या विरोधात पी.एफ्.मध्ये (भविष्य निर्वाह निधी) अपहार आणि फसवणूक केल्याविषयी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ससून मधील कर्मचार्‍यासह कारागृहातील रक्षक आणि समुपदेशक गुन्हे शाखेच्या कह्यात !

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणी ससून रुग्णालयातील कर्मचार्‍यासह कारागृहातील रक्षक आणि समुपदेशक यांना गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे.