रसायनयुक्त सांडपाणी सोडणार्‍या आस्थापनांवर गुन्हा नोंदवा !  

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतींमधील आस्थापनांनी (कंपन्यांनी) गेल्या ४ दिवसांपासून रसायनयुक्त दूषित सांडपाणी सोडल्यामुळे दाभोळ खाडीतील १० गावांमधील मासे मृत झाले आहेत.

ठाणे येथील महाविद्यालयात एन्.सी.सी. प्रशिक्षणाच्‍या नावाखाली विद्यार्थ्‍यांना काठीने मारहाण !

या वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांची इतकी दहशत आहे, की कनिष्‍ठ विद्यार्थी त्‍यांना घाबरून करियर उद़्‍ध्‍वस्‍त होईल या भीतीने तक्रार करण्‍यासाठी पुढे येत नाहीत. प्राचार्यांनीही ‘शिक्षा झालेल्‍या विद्यार्थ्‍यांनी पुढे येऊन तक्रार करावी’, असे आवाहन केले आहे.

चीनमधील अल्पवयीन मुलांना इंटरनेट दिवसातून केवळ २ घंटेच वापरता येणार !

मुलांना भ्रमणभाषच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारनेही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !

(म्हणे) शमसीर क्षमा मागणार नाहीत ! – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उद्दामपणा !

धर्मनिरपेक्ष राज्यघटनेने दिलेल्या पदावर असलेल्या एक मुसलमान व्यक्तीने सर्रासपणे हिंदुद्वेषी विधाने करूनही तिच्याविषयी सरकार, पोलीस, प्रशासन, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आदी कुणीही काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !

शेतीची हानी करणार्‍या माकडांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना हवी ! – अविनाश काळे

सुरक्षित आणि भयमुक्त शेती हा शेतकर्‍यांचा अधिकार आहे. माकडे आणि वानरे यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. हानीभरपाई आकस्मित गोष्टीसाठी दिली जाते; मात्र माकडांचा त्रास हा आकस्मित नसून कायमस्वरूपी आहे.

बंगालमध्ये ‘डेटिंग’ सेवा पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या १६ जणांना अटक !

बंगाल पोलिसांनी ‘डेटिंग’ सेवा पुरवण्याच्या नावाखाली बनावट ‘कॉल सेंटर’ चालवणार्‍यांना १६ जणांना अटक केली आहे.

कोणत्याही क्षेत्रात अव्वल होण्याचा प्रयत्न करा ! -‘पर्यावरण दूत’ धीरज वाटेकर

एकच उद्योग आयुष्यभर चालेल, असा सध्याचा काळ राहिलेला नाही. तुम्हाला बहुआयामी होणे, ही या काळाची आवश्यकता आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात अव्वल होण्याचा प्रयत्न करा, असा कानमंत्र ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार प्राप्त श्री. धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाची अनुमती !

पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार्‍या ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने अनुमती दिली.

अमानुष लाठीमाराची चौकशी करून कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

मुळात हिंदुत्वनिष्ठांनी कोणतीही हुज्जत घातली नाही ना कुठला अनुचित प्रकार केला ! तरीही पोलिसांच्या लाठीमारात काही हिंदुत्वनिष्ठांची डोकी फुटून ते घायाळ झाले आहेत, तसेच येथे आलेल्या नगराध्यक्षांची कॉलरही पोलिसांनी पकडली.

चारा छावणी चालकांची थकित देयके देण्याचा प्रयत्न करू ! – राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल, पशूसंवर्धनमंत्री

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि माळशिरस तालुक्यांतील चारा छावणी देयके अदा करण्याविषयी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.