नितीन देसाई यांच्‍या मृत्‍यूची राज्‍यशासनाकडून चौकशी होणार !

प्रसिद्ध मराठी कलादिग्‍दर्शक नितीन देसाई यांच्‍या मृत्‍यूची चौकशी करण्‍याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑगस्‍ट या दिवशी विधानसभेत केली. 

प्रदीप कुरुलकर यांच्‍यावर देशद्रोहाचा खटला चालवावा ! – जयंत पाटील, प्रदेशाध्‍यक्ष

काही दिवसांपूर्वी पुणे येथे ‘डी.आर्.डी.ओ.’चे उच्‍च पदस्‍थ अधिकारी प्रदीप कुरुलकर यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली; मात्र त्‍यांच्‍यावर ‘ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्‍ट’ अंतर्गत खटला चालू आहे; मात्र हा खटला देशद्रोहाच्‍या गुन्‍ह्यांतर्गत का चालवला गेला नाही ?, असा प्रश्‍न राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष जयंत पाटील यांनी ३ ऑगस्‍टला विधानसभेत उपस्‍थित केला.

ज्ञानतपस्‍वी प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्‍कार घोषित !

११ डिसेंबर २०२२ या दिवशी भोज येथे झालेल्‍या तिसर्‍या कन्‍नड साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्षपद त्‍यांनी भूषवले आहेत. तसेच करवीरपिठाचे जगद़्‍गुरु शंकराचार्य विद्याशंकर भारती यांच्‍या शुभहस्‍ते त्‍यांचा सत्‍कार झाला आहे.

‘लँड (भूमी) जिहाद’ला प्रोत्‍साहन देणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

काँग्रेस सरकारने वक्‍फ बोर्डाला अमर्याद अधिकार देऊन ठेवले आहेत. या कायद्याच्‍या माध्‍यमातून देशभर हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळे एवढेच नाही, तर सरकारी संपत्तीही सहजपणे गिळंकृत करून ती वक्‍फ बोर्डाची संपत्ती घोषित करण्‍याचे षड्‍यंत्र चालू आहे.

चेन्‍नई येथे भारत हिंदु मुन्‍नानीच्‍या मुख्‍य कार्यकर्त्‍यांसाठी ‘साधना’ या विषयावर व्‍याख्‍यान पार पडले !

उपस्‍थित मान्‍यवरांनी उत्‍सुकतेने विषय समजून घेतला आणि शंकानिरसन करून घेत प्रत्‍यक्ष कृती करण्‍याचा निर्धार केला. तसेच स्‍वतःला समजलेली साधना इतरांनाही सांगणार असल्‍याचे उपस्‍थित कार्यकर्त्‍यांनी सांगितले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या समर्थनार्थ गडहिंग्‍लज येथे मोर्चा !

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्‍याला पुष्‍पहार अर्पण करून ध्‍येय मंत्राचे उच्‍चारण करून मोर्चाचा प्रारंभ झाला.

मिरजेत ५ ऑगस्‍टला शरद पोंक्षे राजकीय विश्‍लेषकांची मुलाखत घेणार !

याचे आयोजन ‘श्रीराम सेवा संस्‍थे’च्‍या वतीने करण्‍यात आले असून याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ करून घ्‍यावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

जिल्‍हाधिकारी कार्यालयातील पोलीस चौकीचे लोकार्पण करण्‍याची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात का येत नाही ?

‘पवना बंद जलवाहिनी प्रकल्‍प’ रखडल्‍याने पिंपरी महापालिकेची १७० कोटी रुपयांची हानी !

पाणीपुरवठ्याचा जनहितकारी प्रकल्‍प १४ वर्षे रखडणे, हे प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

(म्हणे) ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा होण्यास आमचे समर्थन !’ – अमेरिका

‘पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता आणि सदैव राहील. त्यामुळे पाकशी चर्चेचा प्रश्‍नच उद्भवत नाही. त्यामुळे अमेरिकेने भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात नाक खूपसू नये’, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !