बक्सर (बिहार) – येथे गंगा नदीमध्ये ३ पाद्रयांनी ५० ते ६० हिंदूंचे धर्मांतर केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यानंतर हिंदु संघटनांनी यास विरोध केला. यानंतर पोलिसांनी तिनही पाद्रयांना अटक केली. पाद्रयांचे म्हणणे आहे की, सर्व लोक स्वतःच्या इच्छेने आले आणि बायबल वाचल्यानंतर त्यांनी स्वतः धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला. ही घटना नागपुरा गावातील महावीर गंगा घाटावर घडली. यांपैकी सॅम्युअल नावाचा पाद्री तमिळनाडूचा, तर पाद्री राजू राम मसिह आणि राजीव रंजन राम हे दोघे जर बिहारचे रहिवासी आहेत.
१. पाद्री राजू राम म्हणाला, ‘‘अनेक लोक माझ्याकडे आले आणि त्यांच्या आजारांविषयी मला सांगितले. मी त्यांना औषध घ्यायला सांगून ‘तुमचा आजार बरा व्हावा; म्हणून मी येशूला प्रार्थना करेन’, असे म्हटले. यानंतर ज्यांच्या वेदना दूर झाल्या, त्यांना आमचा धर्म स्वेच्छेने स्वीकारायचा होता.’’
२. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, आधी आदिवासींचा विनयभंग झाला. आता गरिबांना आमीष दाखवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त केले जात आहे. धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदे आणण्याची आवश्यकता आहे. धर्मांतरामुळे प्रत्येक जिल्हा त्रस्त आहे. आरोग्य आणि शिक्षण यांच्या नावाखाली चमत्कार दाखवून धर्मांतर करणे दुर्दैवी आहे.
संपादकीय भूमिकाअशा घटना रोखण्यासाठी कठोर शिक्षा असणारा धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! |