साडेचार लाख रुपये लुटले !
लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या विरोधात घडणार्या गुन्ह्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. गुरु नानकदेव यांच्या ५५५ व्या जयंतीनिमित्त नानकाना साहिब गुरुद्वारा येथे जात असलेल्या सिंध प्रांतातील लारकाना येथील राजेश कुमार यांना वाटेत दरोडेखोरांनी गोळ्या घातल्या. लाहोरपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाब प्रांतातील मननवाला-ननकाना साहिब रस्त्यावर ही घटना घडली.
राजेश कुमार हे त्यांचा मित्र आणि मेहुण्यासमवेत चारचाकी गाडीतून जात होते. त्या वेळी ३ सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांची गाडी थांबवली आणि त्यांच्याकडील ४ लाख ५० सहस्र पाकिस्तानी रुपये आणि चालकाकडून १० सहस्र रुपये लुटले. राजेश यांनी विरोध केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकापाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित ! |

Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत