चीनमधील अल्पवयीन मुलांना इंटरनेट दिवसातून केवळ २ घंटेच वापरता येणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

बीजिंग (चीन) – चिनी सरकार अल्पवयीन मुलांच्या इंटरनेट वापरण्यावर काही मर्यादा आणण्याच्या सिद्धतेत आहे. यांतर्गत १८ वर्षे वयापेक्षा लहान असलेल्या मुलांना दिवसातून अधिकाधिक दोन घंटेच भ्रमणभाषवर इंटरनेटचा वापर करता येणार आहे. यांतर्गत चीन सरकारने सर्व भ्रमणभाष आस्थापनांना सांगितले की, त्यांनी ‘मायनर मोड’ म्हणून एक पद्धत शोधून काढावी. यामुळे मुले रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत इंटरनेट वापरू शकणार नाहीत. यासंबंधीची मते जनतेकडून मागवण्यात आली असून २ सप्टेंबरपर्यंत ती सरकारकडे पाठवता येतील, असे चिनी अधिकार्‍यांनी सांगितले.

या निर्णयानुसार १६ ते १८ वर्षे वयाच्या मुलांना अधिकाधिक २ घंटे इंटरनेट वापरता येईल. ८ ते १६ वर्षे या वयोगटातील मुलांना १ घंटा, तर त्याहून अल्प वयाच्या मुलांना केवळ ८ मिनिटेच इंटरनेट वापरता येणार आहे.

संपादकीय भूमिका

  • मुलांना भ्रमणभाषच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारनेही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !