ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाची अनुमती !

अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार्‍या ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने अनुमती दिली. अनुमती देतांना ज्ञानवापी परिसरात कोणत्याही प्रकारचे खोदकाम न करण्याचाही आदेश न्यायालयाने दिला. वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या वैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आदेशाला  मुसलमान पक्षाने विरोध केला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी हिंदु आणि मुसलमान पक्षकारांनी त्यांची बाजू मांडली. या वेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अतिरिक्त महासंचालक उपस्थित होते. या सर्वेक्षणात कुठल्या तंत्राचा अवलंब केला जावा ?, याची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. वैज्ञानिक सर्वेक्षणात कुठेही ज्ञानवापीला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी न्यायालयाला दिली.

ज्ञानवापीच्‍या प्रकरणी हिंदूंची बाजू लढवणारे अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन यांनी न्‍यायालयाच्‍या निर्णयासंदर्भात प्रसारमाध्‍यमांना सविस्‍तर माहिती दिली. त्‍यांचे पिता आणि प्रखर हिंदुत्‍वनिष्‍ठ पू. (अधिवक्‍ता) हरिशंकर जैन यांनी ट्‍वीट करून आनंद व्‍यक्‍त केला. ते म्‍हणाले, ‘‘धर्मासाठी हा मोठा विजय आहे. पुरातत्‍व विभागाच्‍या सर्वेक्षणाला अनुमती मिळाली आहे. हर हर महादेव !’’

मुसलमान पक्षाकडून सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान

अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाकडून ज्ञानवापीच्‍या वैज्ञानिक सर्वेक्षणाला अनुमती देण्‍यात आल्‍यावर ‘अंजुमन इंतेजामिया मस्‍जिद कमिटी’ने या निर्णयाला सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले. यावर सर्वोच्‍च न्‍यायालय सुनावणी करणार आहे.

हिंदु पक्षाकडूनही सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

यापूर्वी हिंदु याचिकाकर्त्‍यांनीही सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे. याद्वारे या संदर्भात न्‍यायालयाने कोणताही निर्णय घेण्‍यापूर्वी हिंदु पक्षाची बाजू ऐकण्‍यात यावी, अशी मागणी करण्‍यात आली आहे.

सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत होणार सर्वेक्षण

दुसरीकडे अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाने वैज्ञानिक सर्वेक्षणाला अनुमती दिल्‍यानंतर वाराणसीच्‍या जिल्‍हाधिकार्‍यांनी उद्या, ४ ऑगस्‍टपासून पुरातत्‍व विभागाकडून सर्वेक्षणाला प्रारंभ करण्‍यात येईल, असे सांगितले आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत पुढील काही दिवस हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्‍यानंतर याचा अहवाल