‘इन्क्विझिशन’विषयी (धर्मच्छळाविषयी) विद्यार्थ्यांना माहिती होणे आवश्यक ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत, गोवा.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे आवाहन गोमंतकियांना केले होते. यावरून तथाकथित विचारवंत, काँग्रेस पक्षातील काही नेते आदींनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

सिंधुदुर्ग : शिक्षकांचे आंतरजिल्हा स्थानांतर बंद होणार !

मोठ्या प्रमाणात स्थानांतर होऊन शिक्षक जिल्ह्याबाहेर गेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, तर अन्य काही शाळांमधील शिक्षकांची संख्या घटली आहे. त्यामुळे यापुढे शिक्षक भरती करतांना सुधारित अटी लागू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

धर्म बुद्धीपलीकडे आहे, हे ज्ञात नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे धर्मद्रोही; कारण धर्म बुद्धीच्या पलीकडचा आहे, तरी बुद्धीप्रामाण्यवादी त्याला बुद्धीच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन होणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित आणि महात्मा यांनी सर्वधर्मसमभावाचे नॅरेटिव्ह (कथानक) भारतियांवर थोपवले. त्याने संपूर्ण हिंदु धर्माला घेरले. सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन झाले पाहिजे. असे उद्गार त्यांनी काढले

ठाणे आणि नवीन पनवेल येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !

शिबिरात आलेल्‍या रुग्‍णांवर गुडघेदुखी, मणक्‍याचे त्रास, फ्रोजन शोल्‍डर या त्रासांवर उपचार करण्‍यात आले. उपचारानंतर त्‍यांचा त्रास उणावल्‍याचे रुग्‍णांच्‍या लक्षात आले.

दर्शना पवार हत्‍या प्रकरणातील मुख्‍य आरोपीस अटक !

गेल्‍या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस दर्शना पवार हत्‍या प्रकरणातील मुख्‍य आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत होते. अन्‍वेषण चालू असतांना राहुलने कबुली दिली नव्‍हती; मात्र त्‍यानंतर पोलिसांची ५ पथके त्‍याच्‍या शोधात होती. शेवटी त्‍याला २२ जून या दिवशी मुंबईतून अटक करण्‍यात आली आहे.

दर्शना पवार हिच्‍या मृत्‍यूची सखोल चौकशी करा !

कोपरगाव येथील एम्.पी.एस्.सी. उत्तीर्ण दर्शन पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कोपरगावच्या माजी आमदार आणि भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भ्रष्‍ट कारभार करणार्‍यांना फाशीच हवी !

देशात वाढत असलेल्‍या भ्रष्‍टाचारी नेत्‍यांना जनतेनेच आता निवडणुकीद्वारे कायमचे घरी बसवायला हवे !

लाच स्‍वीकारणारा साहाय्‍यक उद्यान निरीक्षक निलंबित !

उद्यानाच्‍या कामाचे देयक संमत करून त्‍याचा लेखापरीक्षण अहवाल देण्‍यासाठी १७ लाख रुपयांची लाच स्‍वीकारतांना महापालिकेचे साहाय्‍यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ जून या दिवशी कह्यात घेतले होते.