पिंपरी – उद्यानाच्या कामाचे देयक संमत करून त्याचा लेखापरीक्षण अहवाल देण्यासाठी १७ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना महापालिकेचे साहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८ जून या दिवशी कह्यात घेतले होते. महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले असून त्यांची विभागीय चौकशी करण्याची अनुमती दिली आहे. सेवा निलंबन काळात ३ मास अर्धवेतनी रजेइतके वेतन आणि उपजीविका भत्ता देणार असून त्यांना कोणत्याही ठिकाणी नोकरी करता येणार नाही.