पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस दर्शना पवार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत होते. अन्वेषण चालू असतांना राहुलने कबुली दिली नव्हती; मात्र त्यानंतर पोलिसांची ५ पथके त्याच्या शोधात होती. शेवटी त्याला २२ जून या दिवशी मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे नातेवाईक होते. ते दोघे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. राहुलची दर्शनासह लग्न करण्याची इच्छा होती. दोघेही एम्.पी.एस्.सी.ची परीक्षा देत होते. एम्.पी.एस्.सी. परीक्षेत दर्शनाला यश मिळाले आणि तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती; मात्र त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्या मुलासह जमवले आणि लग्नाच्या हालचाली चालू केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने दर्शनाच्या घरच्यांना सांगून पाहिले; मात्र त्यांनी नकार दिला आणि याच अस्वस्थतेतून राहुलने दर्शनाची हत्या केली.