वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे ! – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

मध्यभागी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

सांगली – वारकर्‍यांचे योगदान समाजाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मोलाचे आहे. वारकरी भवनाचे चांगले होण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने साहाय्य देण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. प.पू. गगनगिरी सेवाभावी संस्थेच्या वतीने इनाम धामणी येथे बांधण्यात येणार्‍या श्रीमती चंद्राबाई भाऊसो पाटील वारकरी भवनाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी महापौर किशोर जामदार, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, संजय कांबळे, राजेंद्र खरात आदी मान्यवर उपस्थित होते.